Milk rate subsidy : दुध दरावरील प्रतिलिटर 5 रू अनुदान मिळण्यात शेतकर्यांना अनेक अडचणी

Dairy farming

Milk rate subsidy scheme: राज्यातील अनेक खाजगी दूध संघामार्फत शेतकऱ्यांकडून अत्यल्प दरात दूध खरेदी केलं जात आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात होतं. त्यामुळे राज्य शासनाने यावर तोडगा करण्यासाठी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर दुधावर पाच रुपयांची सबसिडी (milk subsidy scheme)जाहीर केली आहे.

परंतु शासनाने जाहीर केली सबसिडी शेतकऱ्यांना सहजासहजी मिळेल असं दिसत नाही. दुधावरील ही सबसिडी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक किचकट अटींची पूर्तता करावी लागणार आहे. हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या पशुधनाची माहिती संबंधित दूध संस्था केंद्र चालकाला तसेच दूध संघाला द्यायचे आहे .ही दूध अनुदान योजना (milk subsidy scheme) शेतकऱ्यांना 29 फेब्रुवारी पर्यंतच लागू असेल.

अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावे लागेल? 

शासनाने जाहीर केलेले अनुदान दुधउत्पादकांना मिळण्यासाठी दूध उत्पादक सभासदांना खालील सर्व कागदपत्रांची पूर्तता संबंधित दूध संकलन केंद्र चालकास करावी लागेल. तसेच ती कागदपत्र केंद्र चालकांनी दूध संघास सादर करायची आहेत.

या कागदपत्रांमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्याचे नाव, आधार कार्ड लिंक असलेले बँकेचे नाव व शाखा, खाते क्रमांक व आयएफएससी कोड या संपूर्ण माहिती सोबत बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत, आधार कार्डाची छायांकित प्रत, दूध उत्पादकाकडे असलेल्या पशुधनाची संख्या, आधार कार्डशी लिंक असलेल्या पशुधनसंख्येपैकी एअर टॅग केलेली पशुधन संख्या व एअर टॅग क्रमांक इत्यादींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

तसेच आता पशुपालकांना उर्वरित एअरटॅग न केलेल्या दुधाळ पशुंचे जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन एअरटॅग करणे आवश्यक आहे.

पशुधनाची नोंदणी भारत पशुधन पोर्टलवर करणे बंधनकारक आहे. 

एअर टॅग केलेल्या पशुधनाचे नोंदणी भारत पशुधन पोर्टलवर करणे बंधनकारक आहे. पशुपालकाचे आधार लिंक बँक खात्याची नोंदणी भारत पशुधन पोर्टलवर करणे बंधनकारक आहे.

वरील कागदपत्र सहित सर्व माहिती दूध संघास देणे गरजेचे आहे अन्यथा दुधाचे अनुदान मिळू शकणार नाही.

 

एअरटॅग म्हणजे काय? 

एअरटॅगएअरटॅग म्हणजे शेतकऱ्यांच्या जनावरांच्या कानावर लावलेला एक पिवळा बिल्ला होय ज्याच्यावर एक क्रमांक असतो. हा क्रमांक म्हणजे जनावरांचा एक प्रकारचा आधार क्रमांक आहे. या क्रमांकावर जनावराची जात, टॅग लावतेवेळी त्याचे वय, पशूच्या मालकाचे नाव ,मोबाईल क्रमांक ही माहिती नोंद केलेली असते.

हे ही पहा नक्की आवडेल:

अयोध्येत श्रीरामच नाही तर विकास ही अवतरणार; अयोध्येत सुरू आहेत 85000 कोटी रुपयांची विकास कामे

Leave a comment