Namo shetkari scheme second installment: नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता लवकरच मिळणार

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना दुसरा हप्ता(Namo shetkari scheme second installment):-

Namo shetkari scheme

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजनेच्या धरतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना मागील वर्षी सुरू केली होती.

केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये सहा हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात येतो त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एक वर्षांमध्ये सहा हजार रुपये वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा एप्रिल ते जुलै या कालावधीसाठी पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना तब्बल 1720 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. आता शेतकरी संख्येमध्ये वाढ होऊन अंदाजे 95 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा फायदा होणार आहे. राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी तब्बल 1792 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिलेली आहे.

केंद्र सरकारचा पी एम किसान योजनेचा 16 वा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी वितरित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दोन हजार रुपयांचा दुसरा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित होण्याची शक्यता आहे. हा निधी पी एम किसान योजनेच्या हप्त्याबरोबर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे वितरित होणार आहे.

Leave a comment