कांदा निर्यातबंदीत पून्हा वाढ

Onion export ban:केंद्र सरकारला कांदा पिकणाऱ्यांपेक्षा कांदा खाणाऱ्या मतदारांची जास्त काळजीदेशात 31 मार्चनंतरही पुढील सूचना येईपर्यंत कांदा निर्यातबंदी चालू राहणार

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे मिळत असताना आठ डिसेंबर 2023 रोजी केंद्र सरकारने देशात कांदा बंदी लागू केली. ही कांदा बंदी 31 मार्च 2024 रोजी पर्यंत लागू करण्यात आली होती. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या काळात साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल दारात विकला जाणाऱ्या कांद्याचा भाव हे 1000 रुपये प्रति क्विंटल इथपर्यंत खाली आला होता.

31 मार्चनंतर तरी कांद्याला चांगले भाव मिळतील असं स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्याच्या स्वप्नांचा चुराडा करत केंद्र सरकारने कांदा खाणाऱ्या मतदारांचा हित लक्षात घेऊन निवडणुकीच्या तोंडावर बंदीची मुदत अमर्यादित काळापर्यंत वाढवले आहे.

महाराष्ट्र मध्ये रब्बी हंगामात कांद्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यातील कांदा दरवाढ लक्षात घेऊन केंद्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना कमी दारात कांदा उपलब्ध व्हावा यासाठी पुढील सूचना येईपर्यंत 31 मार्च 2024 नंतर ही कांदा निर्यात बंदी लागू ठेवण्याचे ठरवले आहे.

सध्याचे कांदा दर

शनिवर दिनांक 23 मार्च 2024 रोजी राज्यामध्ये कांद्याचे दर हे सरासरी 18 रुपये प्रति किलो याप्रमाणे होते. तर देशाच्या विविध भागांमध्ये कांदा घेतात आठ रुपये ते 13 रुपये प्रति किलो याप्रमाणे होते.

 

Leave a comment