Fastag KYC UPDATE केलेली नाहीये? लवकर करा अन्यथा होईल निष्क्रिय

Fastag  KYC update :वाहनधारकांनो, तुम्ही तर तुमच्या वाहनाची फास्टॅग केवायसी बँकांमधून अपडेट (Fastag kyc update)केले नसेल, तर ते लवकरात लवकर करण्याची गरज आहे कारण पुढील महिन्यापासून केवायसी न केलेले फास्टॅग निष्क्रिय होणार आहेत.

NHAI ने सांगितल्याप्रमाणे, रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, फास्टॅग ग्राहकांनी त्यांचे फास्ट टॅग बँकांमधून 31 मार्चपर्यंत अपडेट करून घेण्याची गरज आहे. अन्यथा एक एप्रिल पासून त्यांचे फास्टॅग केवायसी बिना निष्क्रिय होतील. फास्टॅग वॉलेट मध्ये बॅलन्स असून सुद्धा पेमेंट करता येणार नाही.

एक वाहन, एक फास्टॅग
फास्टॅग ग्राहकांना आता एका वाहनात एकच फास्टॅग वापरता येणार आहे. फास्टॅग वापर करताना आता NHAI च्या एक वाहन, एक फास्टॅग या नवीन धोरणाचा अवलंब करावा लागणार आहे.
पारदर्शकता आणण्यासाठी तसेच टोल प्लाजावर पेमेंट करता वेळ कमी लागावा त्यासाठी NHAI ने एक वाहन, एक फास्टॅग या धोरणाचा अवलंब करण्याचे ठरवले आहे. त्याप्रमाणे वाहनधारकांना आता आपल्या वाहनात एकच फास्टॅग ठेवता येणार आहे. तसेच पूर्वी जारी केलेले सर्व फास्टॅग हे त्या त्या संबंधित बँकांना परत करावे लागणार आहेत. आता फक्त नवीन खातीच सक्रिय राहतील.
फास्टॅग म्हणजे काय?
फास्टॅग हे एक स्टिकर असते, जे वाहनाच्या पुढील विंडसिल्ड वर चिटकवलेले असते. फास्टॅग रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्रज्ञानावर काम करतं. या तंत्रज्ञानाद्वारे टोल प्लाजा वरील कॅमेरे फास्टॅग वरील बारकोड स्कॅन करतात. आणि टोल फी रक्कम आपोआप फास्टॅग वॉलेट मधून कापली जाते.
या फास्टॅग तंत्रज्ञानामुळे वाहनधारकांचा टोल प्लाजावर टोल फ्री भरण्यासाठी लागणारा वेळ वाचतो.

Leave a comment