Safest car for india, भारतातील सर्वात सुरक्षित 10 कार

Top ten safest cars in India:एक जमाना होता जेव्हा भारतातील कार खरेदीदारांचा जास्त मायलेज देणाऱ्या कार विकत घेण्याकडे कल असायचा. परंतु आज-काल भारतातील ग्राहकांचा दृष्टिकोन हळूहळू बदलत आहे. तो जास्त मायलेज देणाऱ्या कार खरेदी करण्याऐवजी कुटुंबाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगले सुरक्षा वैशिष्ट्य असणाऱ्या कार खरेदी करण्याकडे लक्ष देत आहे.

पूर्वी लक्झरी वाटावी अशी एअर बॅग, ISOFIX माउंट, मजबूत स्ट्रक्चरल इंटिग्रिटी, ड्रायव्हर असिस्ट फीचर इत्यादी सुरक्षा वैशिष्ट्ये आज बहुतांश कार उत्पादक कंपन्या मानक म्हणून आपल्या कार मध्ये पूरवत आहेत.

ही सुरक्षा वैशिष्ट्ये कार चालकाला कार क्रॅश होण्यापासून वाचवू शकतात तसेच प्रत्यक्ष अपघातावेळी अपघाताच्या प्रभावाला कमी करू शकतात.

आज अनेक कंपनीची अनेक मॉडेल्स बाजार उपलब्ध आहेत. त्या सर्व मॉडेल्समध्ये कमी अधिक प्रमाणात सुरक्षा वैशिष्ट्ये उपलब्ध असतात. पण कोणतं मॉडेल आपल्यासाठी सुरक्षित आहे हे ठरवणे आता ग्लोबल NCAP (Global new car assessment program) च्या सुरक्षा रेटिंग मुळे सोपे होणार आहे. चला तर पाहूया, कोणतं कार मॉडेल आपल्या कुटुंबातील मोठ्या तसेच लहान सदस्यासाठी सुद्धा सुरक्षित आहे. (Safest car for india)


Top ten safest cars in India

1. टाटा हॅरिअर(Tata Harrier) –

Tata motors कंपनीची ही कार भारतातील सर्वात सुरक्षित कार समजली जाते. ही गाडी SUV या प्रकारात मोडते.

Tata harrier

गाडीचा प्रकार :SUV

किंमत:15.49 लाख ते 24.49 लाख रुपये

NCAP प्रौढ प्रवासी स्कोर: 35पैकी 33.05 (5 स्टार)

GNCAP लहान मुले प्रवासी स्कोर: 49पैकी45 (5स्टार)

 

टाटा हॅरियर सुरक्षा वैशिष्ट्ये

  • सहा एअरबॅग्ज
  • इलेक्ट्रॉनिक स्थिरता कार्यक्रम (ESP)
  • कॉर्नर स्थिरता नियंत्रण
  • हिल होल्ड असिस्ट
  • पॅनिक ब्रेक अलर्ट
  • मागील पार्किंग सेन्सर
  • अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS)

 

2. टाटा सफारी (Tata Safari)

टाटा मोटर्स कंपनीची ही गाडी हॅरिअर गाडीचं सातआसनी वर्जन आहे.

Tata safari

गाडीचा प्रकार :SUV

किंमत: 16.29 लाख ते 25.49 लाख रुपये

NCAP प्रौढ प्रवासी स्कोर: 35पैकी 33.05(5 स्टार)

GNCAP लहान मुले प्रवासी स्कोर: 49 पैकी 45 (5स्टार)

 

टाटा सफारी सुरक्षा वैशिष्ट्ये

  • सहा एअरबॅग्ज
  • इलेक्ट्रॉनिक स्थिरता कार्यक्रम (ESP)
  • हिल होल्ड असिस्ट
  • कर्षण नियंत्रण
  • कॉर्नर स्थिरता नियंत्रण
  • मागील पार्किंग सेन्सर
  • अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS)

 

3. टाटा नेक्साॅन ( Tata Nexon)

टाटा कंपनीची ही गाडी भारतात बनणारी पहिली 5 स्टार GNCAP सुरक्षा रेटिंग मिळवणारी गाडी होती.

Tata Nexon

गाडीचा प्रकार :SUV

किंमत: 7.54लाख ते 13.80लाख रुपये

NCAP प्रौढ प्रवासी स्कोर: 35पैकी 32.22(5 स्टार)

GNCAP लहान मुले प्रवासी स्कोर: 49 पैकी44.52(5स्टार)

 

टाटा नेक्सॉन सुरक्षा वैशिष्ट्ये

  • सहा एअरबॅग्ज
  • ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज
  • ESP
  • इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्शन कंट्रोल
  • आपत्कालीन ब्रेक सहाय्य
  • हिल होल्ड असिस्ट
  • ब्रेक डिस्क पुसणे
  • EBD सह ABS
  • ISOFIX माउंट्स
  • रिव्हर्स पार्किंग असिस्ट कॅमेरा
  • SBR

 

4. फोक्सवॅगन वर्टस ( volkswagen virtus

ही एक फोक्सवॅगन कंपनीची मध्यम आकाराची प्रीमियम सेदान आहे. ही भारतातली सर्वात सुरक्षित सेदान कार आहे.

Volkswagen virtus

गाडीचा प्रकार : प्रीमियम सेदान

किंमत: 11.48 लाख ते 19.29 लाख रुपये

NCAP प्रौढ प्रवासी स्कोर: 35पैकी29.71(5 स्टार)

GNCAP लहान मुले प्रवासी स्कोर: 49पैकी 42 (5स्टार)

 

फोक्सवागन वर्टस सुरक्षा वैशिष्ट्ये

  • सहा एअरबॅग्ज
  • EBD सह ABS
  • मल्टी कोलिजन ब्रेकिंग
  • ट्रॅक्शन कंट्रोल
  • हिल-होल्ड नियंत्रण
  • TPMS
  • ISOFIX चाइल्ड सीट माउंट

 

5. स्कोडा स्लाविया (Skoda Slavia)

फोक्सवॅगन वर्टस प्रमाणे स्कोडा स्लाविया ही मध्यम आकाराची प्रीमियम सेदान कार आहे तसेच या दोन्ही कार सिस्टर कार आहेत त्यामुळे या दोन्ही कारची बनावट एक सारखीच आहे त्यामुळे या दोन्ही कार या सारख्याच प्रमाणात मजबूत आहेत.

Skoda Slavia

गाडीचा प्रकार : प्रीमियम सेदान

किंमत: 10.89 लाख ते 19.12 लाख रुपये

NCAP प्रौढ प्रवासी स्कोर: 35पैकी 29.71 (5 स्टार)

GNCAP लहान मुले प्रवासी स्कोर: 49पैकी 42 (5स्टार)

स्कोडा स्लाविया ची सुरक्षा वैशिष्ट्ये

  • सहा एअरबॅग्ज
  • EBD सह ABS
  • मल्टी कोलिजन ब्रेकिंग
  • ट्रॅक्शन कंट्रोल
  • हिल-होल्ड नियंत्रण
  • TPMS
  • ISOFIX चाइल्ड सीट माउंट

 

 

6.स्कोडा कुशाक (Skoda Kushaq)

स्कोडा कुशाक ही स्कोडा कंपनीची मध्यम आकाराची SUV कार आहे.

Skoda Kushaq

गाडीचा प्रकार :SUV

किंमत: 10.89 लाख ते 20 लाख रुपये

NCAP प्रौढ प्रवासी स्कोर: 35पैकी 29.64 (5 स्टार)

GNCAP लहान मुले प्रवासी स्कोर: 49पैकी 42 (5स्टार)

स्कोडा कुशाक सुरक्षा वैशिष्ट्ये

  • सहा एअरबॅग्ज
  • कर्षण नियंत्रण
  • ABS
  • हिल-होल्ड मदत
  • इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण
  • TPMS
  • मल्टी कोलिजन ब्रेकिंग
  • ISOFIX चाइल्ड सीट माउंट

 

7. फोक्सवॅगन टायगुन (Volkswagen Taigun)

टायगुन ही स्कोडा कुशाक या कारची सिस्टर कार आहे.

 Volkswagen taigun

गाडीचा प्रकार :SUV

किंमत: 11.62 लाख ते 19.76 लाख रुपये

NCAP प्रौढ प्रवासी स्कोर: 35पैकी 29.64 (5 स्टार)

GNCAP लहान मुले प्रवासी स्कोर: 49पैकी 42 (5स्टार)

 

फोक्सवॅगन तैगन सुरक्षा वैशिष्ट्ये

  • सहा एअरबॅग्ज
  • ISOFIX चाइल्ड सीट माउंट
  • इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण
  • मल्टी-टक्कर ब्रेक
  • ब्रेक असिस्ट
  • कर्षण नियंत्रण
  • हिल-होल्ड नियंत्रण
  • टायर प्रेशर डिफ्लेशन चेतावणी

 

8. ह्युंडाई वरणा ( Hyundai Verna)

ह्युंडाई वरणा ही ह्युंडाई कंपनीची मिडीयम साईज प्रीमियम सेदान कार आहे. ही एक भारतातील सर्वात सुरक्षित सेदान कार पैकी एक आहे.

Hyundai Verna

गाडीचा प्रकार : प्रीमियम सेदान

किंमत: 10.96 लाख ते 17.38 लाख रुपये

NCAP प्रौढ प्रवासी स्कोर: 35पैकी 28.18 (5 स्टार)

GNCAP लहान मुले प्रवासी स्कोर: 49पैकी 42 (5स्टार)

 

Hyundai Verna सुरक्षा वैशिष्ट्ये

  • सहा एअरबॅग्ज
  • इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC)
  • कॉर्नर स्थिरता नियंत्रण
  • हिल स्टार्ट असिस्ट
  • वाहन स्थिरता व्यवस्थापन
  • मागील पार्किंग सेन्सर
  • अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS)

 

 

9. महिंद्रा स्कॉर्पिओ- N (Mahindra Scorpio-N)

महिंद्रा स्कॉर्पिओ N हा महिंद्रा स्कार्पियो या महिंद्राच्या आयकॉनिक SUV कारचा अत्याधुनिक अवतार आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ ही गाडी वीस वर्षापासून भारतीय बाजारपेठेवर राज्य करत आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ N हा अवतार नवीन रंगात व नवीन ढंगात नवीन अत्याधुनिक सेफ्टी फीचर्स सहित बाजारात आला आहे.

Mahindra Scorpio N

गाडीचा प्रकार :SUV

किंमत: 12.73 लाख ते 24.03 लाख रुपये

NCAP प्रौढ प्रवासी स्कोर: 35पैकी 29.25 (5 स्टार)

GNCAP लहान मुले प्रवासी स्कोर: 49पैकी 28.93 (3स्टार)

 

महिंद्रा स्कॉर्पिओ-एन सुरक्षा वैशिष्ट्ये

  • सहा एअरबॅग्ज
  • इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण
  • ड्रायव्हरची तंद्री ओळख
  • EBD सह ABS
  • ISOFIX चाइल्ड सीट माउंट
  • TPMS
  • टेकडीवर नियंत्रण ठेवा
  • हिल कूळ नियंत्रण

 

 

10. टाटा पंच (Tata Punch)

टाटा पंच ही टाटा कंपनीची एन्ट्री लेवल मायक्रो SUV प्रकारातील कार आहे. ही भारतातील सर्वात स्वस्त सुरक्षित कार आहे.

Tata punch

गाडीचा प्रकार : micro SUV

किंमत: 5.82 लाख ते 9.48 लाख रुपये

NCAP प्रौढ प्रवासी स्कोर: 35 पैकी 16.45 (5 स्टार)

GNCAP लहान मुले प्रवासी स्कोर: 49 पैकी 40.89 (4 स्टार)

 

टाटा पंच सुरक्षा वैशिष्ट्ये

  • ड्युअल एअरबॅग्ज
  • EBD सह ABSI
  • SOFIX चाइल्ड सीट माउंट
  • मागील पार्किंग सेन्सर्स
  • ब्रेक स्वे कंट्रोल
  • रिव्हर्स पार्किंग कॅमेरा
  • TPMS

तर या आहेत भारतातील सर्वात सुरक्षित 10 वेगवेगळ्या प्रकारच्या कार. आपण आपल्या आवडीच्या व गरजेच्या सेगमेंटची कार खरेदी करू शकता.

 

Leave a comment