Indian cattle breeds:दूध उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या देशी जातीच्या गाईंची, म्हशींची माहिती

Best desi cattle breeds for milk :शेती व्यवसाय फायदेशीर ठरण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसायाकडे वळत आहेत. मागील वीस ते पंचवीस वर्षात भारतामध्ये दुग्ध व्यवसाय मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती केलेली आहे. शेतकरी बंधू आपल्या दुग्ध व्यवसाय मध्ये दुधाचे उत्पन्न वाढण्याकरता खूप सारे प्रयत्न करताना दिसतो.अनेक शेतकरी दुधाचे उत्पादन वाढविण्याकरता अनेक प्रकारच्या देशी-विदेशी गाईंचा तसेच म्हशींचा सांभाळ करतात.

Indian cattle breed

भारतामध्ये अनेक वर्षापासून जर्सी, एचएफ, इत्यादी विदेशी गाईंचा सांभाळ शेतकरी मोठ्या प्रमाणात करताना दिसतात. भारतीय पशुधनाच्या सांभाळण्यास पशुपालक काहीसा उदासीन दिसून येत आहे. त्यामुळे अनेक देशी जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

परंतु आपल्या भारतातील अनेक देशी गाईंचे व म्हशींचे वाण भरपूर दुग्ध उत्पादनासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत.

देशी जातीचे पशुधन सांभाळण्यावर का भर द्यावा?

  • विदेशी पशुधनाच्या तुलनेत देशी पशुधनाची दूध व दुग्धजन्य पदार्थ हे उत्तम दर्जाचे असतात.
  • त्यामुळे या पदार्थांना बाजारात दरही खूप चांगला मिळतो.
  • देशी गाईचे शेणू व गोमूत्रही अत्यंत गुणकारी व लाभदायक असते.
  • विदेशी पशुधनाच्या तुलनेत देशी पशुधन येथील स्थानिक वातावरणाशी चांगल्या प्रकारे जुळवून घेतात त्यामुळे ते कमी आजारी पडतात.
  • त्यामुळे देशी जनावरे सांभाळणे कमी खर्चाचे व फायदेशीर ठरते.
  • ब्राझील सारख्या देशाने आपल्या गीर, साहिवाल या गायी तसेच जाफ्राबादी म्हैस आयात करून या जातीवर खूप मेहनत घेतली आहे. आता हा देश या जातीच्या जनावरांपासून विक्रमी दूध उत्पादन घेत आहे.

अशाच काही देशी जातीच्या गाईंची व म्हशींची माहिती आपण घेणार आहोत.

Best desi cattle breads for milk :

गाईंच्या दुधाळ देशी जाती-

१. गिर

Gir cow

ही गाय प्रामुख्याने गुजरात राज्यातील भावनगर, राजकोट,अमरेली तसेच जुनागड जिल्ह्यात आढळते.

वैशिष्ट्य-

या गाईचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या गाईचे लांब कान. प्रामुख्याने लाल रंग असलेली ही गाय शरीराच्या बांध्याने अत्यंत मजबूत असते.

दूध उत्पादन: या गाईचे सरासरी दूध उत्पादन वीस लिटर प्रतिदिन इतके असते.

२. साहिवाल

Sahiwal

ही गाय प्रामुख्याने पंजाब मधील अमृतसर, फिरोजपुर व राजस्थान मधील गंगा नगर या जिल्ह्यात आढळते.

वैशिष्ट्ये-

टोकदार शिंगे व लाल रंग असलेल्या या गाईच्या दुधात फॅटचे प्रमाण अत्यंत उत्तम असते.

दूध उत्पादन: या गाईचे सरासरी दूध उत्पादन 13 लिटर प्रतिदिन इतके असते.

३. राठी

Rathi

ही गाय राजस्थानमधील बिकानेर, गंगानगर, जैसलमेर या जिल्ह्यात आढळते

वैशिष्ट्ये-

या गाईचे अंग लांब सडक असते व तिच्या संगोपनाचा खर्च अत्यंत कमी प्रमाणात असतो.

दूध उत्पादन: सरासरी दूध उत्पादन दहा लिटर प्रतिदिन

४. थारपारकर किंवा ग्रे सिंधी किंवा पांढरी सिंधी

Tharparkar

गुजरात राज्यातील कच्छ तसेच राजस्थानमधील बारमेर, जोधपुर व जैसलमेर जिल्ह्यात आढळते.

वैशिष्ट्ये: पांढरा तसेच करडा रंग

दूध उत्पादन: सरासरी दूध उत्पादन प्रतिदिन आठ ते नऊ लिटर

५. कांकरेज

Kankarej

राजस्थानातील बारमेर, जोधपुर तसेच गुजरात मधील मेहसाणा, खेडा, बनासकंठा, साबरकांडा, आमदाबाद तसेच कच्छ या जिल्ह्यात आढळते.

वैशिष्ट्ये-गोलाकार व जाड अशी शिंगे

दूध उत्पादन: दूध उत्पादन सरासरी पाच ते सहा लिटर प्रतिदिन

६. गवळाऊ

Gowlao

 

ही गाय महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, कारंजा, सेलू व हेटिकुंडी तसेच नागपूर जिल्ह्यातील नरखेड व काटोल या तालुक्यात आढळते.

वैशिष्ट्ये: पांढरा रंग

दूध उत्पादन: सरासरी दूध उत्पादन तीन ते चार लिटर प्रतिदिन

 

म्हशींच्या दूधाळ देशी जाती

१. पंढरपुरी

Pandharpuri

 

महाराष्ट्रातील सोलापूर सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात आढळते.

वैशिष्ट्ये: लांब व टोकदार शिंगे तसेच काळा कुळकुळीत रंग. दुधामध्ये फॅटचे प्रमाण जास्त

दूध उत्पादन: सरासरी दूध उत्पादन प्रतिदिन वीस लिटर

२.मुर्हा

Murha

हरियाणा राज्यातील रोहतक, हिसार, गुडगाव तसेच जिंद या जिल्ह्यात आढळते.

वैशिष्ट्ये: ही म्हैस अंगापिंडाने अत्यंत मजबूत मजबूत असते तसेच शिंगे गोलाकार असतात.

दूध उत्पादन: सरासरी दूध उत्पादन प्रति दिन 20 लिटर

३.जाफराबादी

Jafarabaadi

या म्हशी प्रामुख्याने सौराष्ट्र, गीर जंगल व जाफराबाद जिल्ह्यात आढळतात.

वैशिष्ट्य:मजबूत बांध्याच्या या म्हशीला डोळ्यापासून शिंगे असतात. या म्हशीच्या दूधात फॅट्सचे प्रमाण उत्तम असते.

दूध उत्पादन: सरासरी दूध उत्पादन प्रतिदिन 16 लिटर

 

४. नागपुरी

Nagapuri

या म्हशीला बोरारी, वऱ्हाडी तसेच गवळाऊ म्हणून देखील ओळखतात. ही म्हैस विदर्भातील नागपूर,वर्धा, अमरावती, अकोला तसेच यवतमाळ जिल्ह्यात आढळते.

वैशिष्ट्ये: लांब शिंगे व मध्यम बांधा असलेली ही म्हैस रंगाने करड्या रंगाची असते.

दूध उत्पादन:सरासरी दूध उत्पादन प्रतिदिन 10 लिटर

५.मराठवाडी किंवा दुधणाथडी

Marathwadi

जालना, परभणी, बीड, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात प्रामुख्याने आढळून येतात.

वैशिष्ट्य: या म्हशी रंगाने काळ्या, सरळ शिंगे व मध्यम बांध्याच्या असतात.

दूध उत्पादन:सरासरी दूध उत्पादन प्रतिदिन 7 लिटर

 

 

 

Leave a comment