News:अहमदनगर आता पुुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर;मंत्रीमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय

 

Mantrimandal nirnayमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासहित मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये अहमदनगर शहराच्या नामांतरणाबरोबर(Ahmadnagar name change) राज्याचे विकासाचे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

अहमदनगरचे नामांतरण

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अहमदनगर शहर व जिल्ह्याच्या नामांतरणास मंजुरी देण्यात आली. अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नामांतरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली.

पुणे जिल्ह्यातील वेल्हे या तालुक्याचे नामांतरण

पुणे जिल्ह्यातील वेल्हे या तालुक्याचे राजगड असे नामांतरण करण्यास मंत्रिमंडळाचे मान्यता मिळाली आहे. वेल्हे तालुक्याचे ऐतिहासिक महत्त्व खूप मोठे आहे. याच तालुक्यामध्ये राजगड व तोरणा हे स्वराज्यासाठी महत्त्वाचे किल्ले वसलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडावरूनच पहिल्यांदा स्वराज्याचा कारभार हाकला. त्यामुळे राजगडाला स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचा मान आहे. त्याचमुळे वेल्हे या तालुक्याला राजगड असे नाव देण्यात आले आहे.

मुंबईतील ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलली. 

मुंबईतील अनेक उपनगरीय रेल्वे स्थानकांची नावेही ब्रिटिशकालीन इंग्रजी नावावरून ठेवण्यात आलेली होती. जी आता मुंबईतील स्थानिक मराठी नावावरून ओळखली जातील. मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात आली आहेत त्यामध्ये करी रोड स्थानकाचे नाव लालबाग, मरीन लाईन रेल्वे स्थानकाचे नाव मुंबादेवी, सेंड हर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे नाव डोंगरी, कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचे नाव काळाचौकी, चर्णी रोडचं गिरगाव, डाॅकयार्ड स्थानकाचे नाव माझगाव माजगाव, किंग सर्कल रेल्वे स्थानकाचे नाव तीर्थकर पार्श्वनाथ तर मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नाव नाना जगन्नाथ शंकर शेठ असं करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

इतर महत्त्वाचे निर्णय

  • पोलीस पाटलाच्या मानधनात भरीव वाढ करत आता महिन्याला पंधरा हजार रुपये देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
  • केंद्र सरकारच्या मदतीने राज्यातील लहान शहरातील अग्निशमन दल बळकट करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने राज्याच्या हिस्स्यासाठी 153 कोटीच्या खर्चास मंजुरी दिली.
  • श्रीनगर जवळ महाराष्ट्र राज्य अतिथिगृह बांधण्यात येणार असून त्यासाठी अडीच एकरचा भूखंड घेण्यात येणार.
  • जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग बांधणीच्या कामासाठीच्या राज्याच्या हिश्याच्या 2453 कोटी रुपये खर्चास मंजुरी.
  • मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत 23 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात येणार असून यावर्षी दहा हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बनणार.
  • उत्तन ते विरार सागरी सेतू बांधणीस मान्यता
  • आशा स्वयंसेविकाच्या मानधनात पाच हजार रुपयांची वाढ करण्यात येणार.
  • मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता मिळाली असून याद्वारे 35 गावांना लाभ मिळणार आहे.
  • राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यात येणार असून याद्वारे हजारो कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे.

Leave a comment