AIF government scheme for agriculture: शेतकर्यांना मिळेल त्वरित विनाजामिनदार कर्ज; होईल ६ लाखापर्यंत बचत

AIF Government scheme for agriculture

Aif

शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी या करिता भारत सरकारच्या कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयातर्फे अनेक योजना आणल्या जातात. या योजनांचा लाभ घेणे शेतकऱ्यासाठी खूपच सोपे आहे. कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयातर्फे एक खूपच फायदेशीर योजना चालवली जाते ती म्हणजे एग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड(AIF) योजना. 

या योजनेद्वारे देशातील लहानात लहान तसेच मोठ्यात मोठा शेतकरी आपल्या शेतीसाठी आवश्यक विकास कामांसाठी निधी उभारू शकतो. देशातील लहान शेतकरी, मोठा शेतकरी, एफपीओ किंवा कृषी उद्योजक आपल्या आवश्यकतेनुसार या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या योजनेमधून शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये वेअर हाऊस, आटा चक्की , डाळ मिल , कोल्ड स्टोरेज तसेच इतर अनेक शेतीतील विकास कामांकरता बँकेकडून कर्ज मिळणार आहे. शेतकऱ्यांना यासाठी कोणत्याही जामीनदाराची गरज लागणार नाही. यासाठी सरकारच जामीनदार असेल. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना बँकेच्या कर्जाच्या रकमेवर 3 टक्के व्याज दारात सवलत मिळणार आहे. ही सवलत जास्तीत जास्त दोन कोटी एवढ्या रकमेवर मिळणार आहे.

शेतकरी आपला आवश्यकतेनुसार दोन कोटी पेक्षा जास्तही कर्ज मिळू शकतो परंतु तीन टक्के व्याजदर सवलत ही फक्त दोन कोटीपर्यंतच लागू असेल. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 6 लाखापर्यंत फायदा मिळणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अगदी सोप्या पद्धतीने कर्ज मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना खूपच कमी कागदपत्रांची गरज लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बँकेत खूपच कमी हेलपाटे मारावे लागणार आहेत.  जामीनदारही सरकारच होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना जामीनदारही शोधावा लागणार नाही.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना https://agriinfra.dac.gov.in/Home या लिंकला भेट देऊन फॉर्म भरायचा आहे. एकदा फॉर्म भरल्यानंतर या योजनेच्या माध्यमातून 60दिवसाच्या आत मध्ये तुम्हाला कर्जाची रक्कम मिळेल या प्रकारच्या सूचना केंद्र सरकारने बँकांना दिलेल्या आहेत.

 

इतर महत्त्वाच्या योजना:

Leave a comment